नवी दिल्ली | दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालच्या एका न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर आता अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीविरोधात कोळसा घोटाळा प्रकरणी ‘सीबीआय’ने समन्स बजावला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.
कोळसा चोरी प्रकरणातील मुख्य सुत्रधार मांझी उर्फ लाला याच्याविरोधात मागच्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता. मांझी हा भाड्याने घेतलेल्या खाणीतून कोळशाची चोरी आणि अवैध खाणकाम करायचा. यासर्व प्रकरणानंतर निवडणुकीच्या तोंडावर होणारे राजकीय नाट्य हा चर्चेचा विषय बनला आहे.
या विषयावर भाष्य करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सूडबुद्धीतून ही कारवाई झाली आहे, पण आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत असला तरी आम्ही घाबरणार नसल्याचं तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.
2018 ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात खोटे संदर्भ आणि खोटे आरोप केल्यासंबंधी त्यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे अभिषेक बॅनर्जी यांनी अब्रुनूकसानीचा दावा केला होता. याचप्रकरणी, बंगालच्या विशेष न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उत्तर देण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”
‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा
येत्या काळात भाजप ‘आरक्षण’ बाजूला काढेल- जितेंद्र आव्हाड
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वत:च केला खुलासा म्हणाली…
पोलीस मारहाण प्रकरणात ‘या’ भाजप आमदाराला अटक