बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी सीबीआयने (CBI Raid) छापेमारी केली आहे. सीबीआयकडून सध्या 20 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात येत आहे. याबद्दल स्वत: मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

सीबीआयचं आमच्या घरी स्वागत आहे. चौकशी दरम्यान आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू, जेणे करून सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या आहेत. पण त्यातून काही बाहेर आलं नाही. मला पूर्ण विश्वास आहे की या छापेमारीतूनही काही साध्य होणार नाही. मी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. अन् त्याला कुणीही रोखू शकत नाही, असं ट्विट सिसोदिया यांनी केलं आहे.

आम्ही ईमानदार आहोत. लाखो बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. चांगल्या कामात अडथळे आणले जात आहेत. म्हणून आपला देश पहिल्या क्रमांकावर पोहोचू नाही, असंही सिसोदियांनी म्हटलं आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More