बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही सीबीआयने चौकशी करावी”

मुंबई | आज ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी जाऊन छापेमारी केली. यावरून विरोधी पक्ष आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता अनिल देशमुखांची काही दिवसांनी तुरूंगात रवानगी होणार आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी यावेळी मंत्री अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर देखील निशाणा साधला.

अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केलीये. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील उपस्थित होते.

अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरांना यांना पण त्याच वाटेवर जावं लागणार आहे. मिलिंद नार्वेकरांनी दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब यांच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडं कापली असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांसाठी खुशखबर! बहुप्रतिक्षीत ‘स्पुटनिक वी’ लस ‘या’ तारखेपासून मिळणार

“शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज, पवारांचा सल्ला मोदीही घेतात”

“पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं वागणं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं”

‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’; खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं

सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?- संजय राऊत

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More