सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचा नवा खुलासा, धक्कादायक माहिती समोर
मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला. सुशांतच्या मृत्यूच्या बातमीने कलाविश्वासह संपूर्ण देश हादरला.
सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा त्याच्या मृत्यूनंतर करण्यात आला. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला. या प्रकरणात आता सीबीआयकडून एक महत्त्वाचं अपडेट देण्यात आलं आहे.
सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला असल्याचा चर्चा रंगल्या होता. मात्र, या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याचा खुसाला सीबीआयने केला आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू असल्याचं सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, एका व्यक्तिने माहिती अधिकारांतर्गत सुशांत सिंह प्रकरणातील तपासाबाबतचा खुलासा करण्याचा अर्ज केला होता. सीबीआयने याबाबत माहिती देण्यास नकार दिला. याबाबत तपास सुरू असून माहिती दिली तर त्यात अडथळा येऊ शकतो, असं स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! अमेरिकेचा रशियाला जोरदार झटका
“उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे एटीएम, नोटा छापण्याची एक मशीन”
मनसेवर नाराज वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंची खास ऑफर
छगन भुजबळांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण, म्हणाले…
कोरोना निर्बंध हटवल्यानंतर राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.