बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षा आता वर्षातून दोनवेळा होणार!

नवी दिल्ली |  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक परीक्षेबाबत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 ला बोर्डाने आता 2 भागात विभागले असल्याची माहिती देण्यात येत आहे. तसेच आता पूर्वी पेक्षा अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे.

कोरोना संकटाच्या काळात शाळा व कॉलेजेस ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. त्यातच कोरोनाचं संकट दीड वर्षांपासून कमी होण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे आता परीक्षा घेण्याची शक्यता कायम राहावी यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आणि परिणामी पुन्हा एकदा नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले. तसेच यंदाच्या वर्षी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जून महिन्यात बैठक झाली आणि परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जरी वर्षातून दोनवेळा होणार असल्या तरी अभ्यासक्रम तोच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच विद्यार्थ्याच्या असाईनमेंट आणि प्रॅक्टिकलवर भर देण्यात येणार आहे. तसेच त्याचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

थोडक्यात बातम्या –

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More