दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार? जाणून घ्या तारखा

10th Board Exam

10th Board Exam l दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नवीन धोरणानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोनवेळा परीक्षा होणार आहे. या संदर्भातील मसुदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार देखील केला आहे. मात्र हे धोरण 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

परीक्षेच्या तारखा काय? :

पहिला टप्पा – 17 फेब्रुवारी ते 6 मार्च
दुसरा टप्पा – 5 मे ते 20 मे

10th Board Exam l परीक्षेचे स्वरूप :

– विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याची संधी मिळेल.
– दोन्ही परीक्षांमधील सर्वोत्तम गुण (Best Score) अंतिम निकालासाठी ग्राह्य धरले जातील.
– वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल.
– नवीन शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांची निवड करण्याची संधी मिळेल.

विद्यार्थ्यांना काय फायदा होणार? :

– वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना तणाव कमी होईल.
– विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची आणि चांगल्या गुणांसाठी प्रयत्न करण्याची संधी मिळेल.
– विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करता येईल.
– नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक आनंददायी आणि उपयुक्त वाटेल.

शिक्षण मंत्रालयाचे ध्येय काय? :

– शिक्षण मंत्रालयाचे ध्येय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आहे.
– नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक चांगल्या संधी मिळतील.
– शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

News title : CBSE Board Exam Twice a Year: Major Changes Announced!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .