बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार प्रकरणात CCTV फुटेज व्हायरल ; पाहा व्हिडीओ

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी दुपारी भरदिवसा गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घडली घटना आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहर चांगलंच हादरलं आहे. अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लावं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केला आहे. दुपारी दीडच्या सुमारास हा गोळीबार झाला होता. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण त्याच्या एकदिवस आधी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीची घटना घडली आहे.

1 मे ला दुपारी अँथनीच्या कार्यालयात घुसून दोन कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँथोनी यांच्या कंपनीचा मॅनेजर तानाजी सावंत कुठे आहे, हे न सांगितल्याच्या कारणातून दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे या आमदार पुत्रासह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आल्यानं सर्वाना धक्का बसला आहे. मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 10 जणांवर गुन्हा दाखल आहे. तर दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे या आमदार पुत्रासह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या-

अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 10 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील सक्रिय रूग्णसंख्या घटली; बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, वाचा आकडेवारी

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डाॅक्टरला मारहाण ; पाहा व्हिडीओ

‘प्राण जाये पर शान ना जाये’; कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांना असा होतोय तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा

‘पीएम केअरचा पैसा बाहेर काढा’; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुलं पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More