बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अपघाताच्या 24 तासांपूर्वी बिपीन रावत यांनी दिला होता ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई | देशाचे माजी लष्कर प्रमुख आणि देशाचे पहिले CDS बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या हेलिकाॅप्टरला आज अपघात झाला आहे. तमिळनाडूमध्ये त्यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात झाला. त्यानंतर बिपीन रावत गंभीर जखमी असल्याचं कळत आहे. अशातच अपघाताच्या 24 तासांपूर्वी बिपीन रावत यांनी देशाच्या सुरक्षिततेविषयी गंभीर इशारा दिला होता. (CDS Bipin Rawat Helicopter crash in Tamilnadu)

आता सर्व प्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे गरजेचं असल्याचं मत बिपीन रावत यांनी व्यक्त केलं होतं. कोरोना महामारीचा उल्लेख करत त्यांनी सध्या जगावर घोंगवत असलेल्या जैविक युद्धाबद्दलही इशारा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी काही मानवनिर्मित संकटांचा देखील इशारा दिला होता.

आजपर्यंत देशात अनेक संकट आली आहे. त्यातील काही संकट ही मानवनिर्मित होती. जगात आता नव्या प्रकारच्या युद्धांना आकार घेवू लागलाय. आपली राष्ट्रे या सर्वांना प्रभावित होणार नाहीत, याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे, असं वक्तव्य बिपीन राऊत यांनी केलं होतं.

दरम्यान, या अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. राजनाथ सिंह संसदेत देखील या घटनेची माहिती देणार आहेत. त्यांनी जनरल बिपीन रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन कुटुबीयांच्या भेट घेतली.

थोडक्यात बातम्या-

“2024 मध्ये भाजपचे 418 खासदार येणार, सगळे मोदींनाच मतदान करणार”

अन् राजसाहेब मला म्हणाले,”तू काही स्ट्रेसमध्ये आहेस का?”; वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; वाचा सविस्तर माहिती

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

भाजप उदयनराजेंवर नाराज? साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More