बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

नवी दिल्ली | सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं बुधवारी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दुर्दैवी निधन झालं. बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या इतर 11 जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या बातमीनंतर देशभर एकच खळबळ उडाली. (IAF Helicopter Crash)

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये प्राण गमावलेले भारताचे पहिले सीडीएस जनरल (CDS General) बिपीन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिव शरीरावर शुक्रवार 10 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर जनरल बिपीन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच पार्थिव आज मिलिट्री विमानानं दिल्लीत आणलं जाणार आहे.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं पार्थिव शुक्रवारी दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला अखेरची सलामी देण्यासाठी ठेवलं जाणार आहे.त्यानंतर दिल्लीतील कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत शासकीय इतमामात जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील.

जनरल बिपीन रावत यांचा कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नुर येथे भीषण अपघात झाला. हवाई दलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. सर्वात सुरक्षित समजले जाणारे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने सुरक्षा यंत्रणेच्या भुवयाही उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘..तरी ठाकरे सरकारच्या अहंकारापुढे झुकणार नाही’; आशिष शेलार आक्रमक

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदार आशिष शेलारांना झटका; ‘तो’ वाद पेटण्याची शक्यता

संजय राऊतांनी घेतली प्रियंका गांधींची भेट; तासभर चर्चेनंतर राऊत म्हणाले…

दिलासादायक! पहिला Omicron बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More