गाईला मिठी मारून साजरा करा ‘Valentine Day’; सरकारचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जगभरात 14 फेब्रुवारी हा Valentine Day म्हणून साजरा केला जातो. या वर्षाचा Valentine Day काही दिवसांवर आला आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना 14 फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा असं आवाहन केलं आहे.

सर्व गाईप्रेमींनी गाईचे महत्त्व लक्षात घेऊन 14 फेब्रुवारी हा दिवस गायींना मिठी मारून साजरा करावा, यामुळे जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होईलं, असं पशुसंवर्धन मंत्रालयाने म्हटलंय.

गाय भारतीय संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपल्या जीवनाचा आधार आहे. गाय पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. तिला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखलं जातं, असं पशु कल्याण मंडळाने त्यांच्या आवाहन पत्रकात म्हटलंय.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या आवाहनावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणाला मिठ्या मार बोललो नाही. केंद्र सरकारने आवहन केलंय प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा, असं त्या म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-