भोपाळ | पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करणाऱ्या भाजप आमदाराला जामीन मिळाला. त्याच आनंदात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.
इंदूरमधील भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचा कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार करुन जल्लोष केला.
इंदूरमधील भाजप कार्यालयासमोर समर्थकांनी आनंद साजरा केला. त्यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली.
इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र बायस यांना बॅटने मारहाण केल्यामुळे आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. भोपाळच्या विशेष न्यायालयाने 20-20 हजारांच्या जात मुचलक्यांवर त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या-
-नदीवरील नव्या पुलाचा जोडरस्ता खचला; संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांनाच बांधलं पुलाला
-इंग्लंडला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज
-पबजी खेळू न दिल्यामुळे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
-महाराष्ट्रात वंचितला सोबत घ्या; राहुल गांधींच्या राज्यातील नेत्यांना सूचना
-ह्या तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा; वंचितचा अल्टिमेटम
Comments are closed.