Censor Board | पद्मश्री नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) प्रदर्शनाची परवानगी नाकारली आहे. दलित आणि गोरगरिबांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या ढसाळ यांच्या कविता चित्रपटातून वगळण्याची अट बोर्डाने घातली आहे.
नामदेव ढसाळ कोण?
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने एक नोटीस पाठवून, ‘नामदेव ढसाळ कोण आहेत, आम्हाला माहीत नाही’, असा धक्कादायक सवाल केला आहे. “त्यांच्या कविता काढल्या, तरच चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी मिळेल,” असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हश्मी यांनी ही नोटीस पाठवल्याचे समजते. ‘गोलपीठा’ या कवितासंग्रहातून दलित समाजातील वास्तव मांडणाऱ्या नामदेव ढसाळ यांच्या कवितांवरच आक्षेप घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
‘वाघ्या-मुरळी’ लोकनृत्यावरही आक्षेप
सेन्सॉर बोर्डाने ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाला ‘यू’ (U) प्रमाणपत्र नाकारले असून, ‘ए’ (A) प्रमाणपत्रासाठी अनेक सूचना केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बोर्डाने वाघ्या-मुरळीच्या लोकनृत्याला ‘स्टेज डान्स’ म्हटले आहे.
तसेच, चित्रपटातील मंदिराची दृश्ये आणि ‘हरामखोर’ शब्द काढून टाकण्यास सांगितले आहे. यासोबतच, कवितेतील काही शब्द काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Censor Board)
Title : Censor Board Rejects Namdeo Dhasal Biopic