बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; केंद्राने घेतला हा निर्णय

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसैनिही संतापले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या कार्यालय व घरांवर तोडफोड होत आहे. यामुळे आता या आमदारांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

काल शिंदेगटातील 15 आमदारांनी केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपालांकडे सुरेक्षेच्या कारणास्तव पत्र लिहिलं होतं. यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला आहे. राज्यात होत असलेल्या हिंसेमुळे हा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. आज संध्याकाळपर्यंत सीआरपीएफचे जवान या 15 आमदारांच्या घरी तैनात केले जातील.

आजही या बंडामुळे अनेक शिवसैनिकांकडून संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या घरावर आणि ऑफीसवर तोडफो़ड करत जाळपोळही करण्यात आला आहे

दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढली आहे. काही ठिकाणी या आमदारांना विरोध तर काही ठिकाणी पाठिंबा दर्शवला जात आहे.

थो़डक्यात बातम्या 

राज्यपाल इज बॅक, भगतसिंह कोश्यारींना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

“काय झाडी.., काय डोंगार.., काय हाटेल….. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का?”

“हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा”

‘कब तक छीपोगे गोहाटीमे’; झिरवळांचा फोटो शेअर करत राऊतांनी आमदारांना डिवचलं

संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More