बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसींचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्रानं सुचवला हा खास उपाय

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. यातच देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या अनेक लसी न वापरताच वाया गेल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 8 जून रोजी लसीकरणासंदर्भातील नियमावली जाहीर केली होती.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र देशामध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच अनेकदा लसी वाया गेल्याची माहिती अनेकदा समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात कोरोना लसीचा अपव्यय एक टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष्य आवाहन केले आहे.

लसीकरण अशा प्रकारे आयोजित करण्यात यायला हवं की कमीत कमी लस वाया जाईल आणि बहुतेक राज्यांनी हे अमलात देखील आणलं आहे. यामध्ये लस देणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. लस दिल्यानंतर त्या कुप्या उघड्याच ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे लस देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की लसीच्या कुप्या उघडल्या नंतर चार तासांमध्ये त्याचा वापर करण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींंचा भाऊ सांगत बाप-लेक करायचे ‘हे’ धक्कादायक कृत्य

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीची महिला पोलीस हवालदारानं काढली आरती, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! दोन लहान मुलांसह सगळ्या कुटंबाला डंपरने चिरडलं, काळीज घट्ट करून पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या या भारतीय लस कंपनीला मोठा झटका, लसीच्या आतप्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार

अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ कारणामुळे पाच वर्षाच्या मुलाला मातीत पुरलं अन्….

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More