बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील नव्या भाजप नेत्यांचा समावेश होत आहे. तसेच प्रकाश जावडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना डच्चू मिळत असला तरी काही मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागत आहे.

भाजपचे नेते व खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी सोहळ्याला अवघ्या काही वेळापूर्वीच सुरुवात झाली असून नारायण राणे यांनी सर्वप्रथम शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रपती भवन मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आतील शपथविधी पार पडत आहे या दरम्यान आतापर्यंत नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू यांचा शपथविधी पार पडला आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यातील भाजप नेत्यांची वर्णी लागणार आहे.

हा शपथविधी सोहळा सध्या सुरू असून आज जवळपास 30 पेक्षाही अधिक नव्या चेहऱ्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेल्या चेहऱ्यांना नेमके कोणते खाते मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, नारायण राणेंनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दोन पुत्रांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच संपूर्ण कोकणात राणे समर्थक जल्लोष करत आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More