बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ताकद कमी झाली तरी महाराष्ट्रात आणि जनतेच्या मनात आम्हीच”

नवी दिल्ली | राजकीय घडामोडींना वेग आला असताना महाराष्ट्रात मध्यावती निवडणुका लागतील, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं. तर हे खरं असून गुजरातमध्येही मध्यावती निवडणुका लागणार असल्याचं भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं.

सत्ताधारी सोयीनुसार न्याय देणार ही लोकशाही नाही. राज्यात कायद्यांचं राज्य राहिले ऩाही. सध्या ज्यांच्या हाती सत्ता तो पारधा अशी अवस्था झाली आहे. बंडघोर नेत्यांनी थोडा विचार करावा. ज्या शिवसेनेचे नाव आणि तिकीट घेऊन तुम्ही सत्तेत आलात त्यांच्याशी बंडखोरी केली, असंही राऊत म्हणाले.

शिवसेना म्हणजे युक्रेन नाही कोणीही येऊन फो़डून जाईल. शिवसेनेची ताकद विधीमंडळात जरी कमी झाली असली तरी महाराष्ट्रात आणि जनतेच्या मनात आम्ही आहोत. शिवसेना कमजोर झाली असं म्हणल्यास बाळासाहेबांचा अपमान आहे, असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं.

भाजपने हेच जर अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर आज अडीच वर्षानंतर निदान मुख्यमंत्रीपद मिळाल असतं. आता हे स्पष्ट झालं आहे की भाजपला शिवसेना फोडायची होती. शिवसेना फोडून त्यांना महाराष्ट्र आणि मुंबईचे तुकडे करायचे आहेत, असा थेट आरोप संजय राऊतांनी केला.

थोडक्यात बातम्या

‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात

मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच

शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”

‘केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही’; सभागृहात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More