बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! खाद्य तेलाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महत्वाचा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. गगनाला भिडलेली महागाई आणि येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमुळे सर्वसामान्यांवरचा ताण वाढला होता. एकंदर परिस्थिती बघता केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

या सणासुदीच्या काळात खाद्यतेल स्वस्त व्हावं यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन, सुर्यफुल आणि पाम कच्या तेलावरील कृषी करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या अर्थात सीबीआयसीच्या अधिसूचनेनुसार कच्च्या पाम तेलावर 7.5 टक्के कृषी विकास उपकर आकारला जाणार आहे.

तर कच्च्या सूर्यफूलाच्या तेलावर आणि कच्च्या सोयाबीन तेलावर कृषी विकास उपकर हा 5 टक्के असणार आहे. सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या कच्च्या प्रकारावर 5.5 टक्के तर पाम तेलाच्या कच्च्या प्रकारावर 8.25 टक्के सीमा शुल्क असणार आहे. कृषी करातील ही कपात 14 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत लागू राहणार असल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

खाद्यतेलात सूट देण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी देशात इंधन दरवाढ कायम आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्यानंतर नॅच्युरल गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत देखील या महिन्यात दोनदा वाढ झाली आहे. सततच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित मात्र कोलमडलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय, इतर देशांनी कर्ज नाकारल्याने निघणार दिवाळं

ऑनलाइन मद्य खरेदी करणं महिलेला पडलं महागात, बसला लाखोंचा गंडा

आर्यन खानची कोठडी आज तरी संपणार का? जामीन अर्जावर आज परत सुनावणी

तेजस ठाकरे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला राजकारणात प्रवेश करणार?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More