Top News देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलं गिफ्ट!

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी केंद्र सरकारने महाराष्ट्राला गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारनं अनेक राज्यांना वस्तू आणि सेवा कराचा (जीएसीटचा) परतावा दिला आहे. महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक सर्वाधिक परतावा मिळाला आहे.

केंद्राने सोमवारी महाराष्ट्राच्या वाट्याचा 19 हजार 233 कोटींचा परतावा मंजूर केला आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवर लढणाऱ्या महाराष्ट्राला मोठी दिलासा मिळालेला आहे.

गेले अनेक दिवस जीएसटीचा परतावा मिळावा म्हणून राज्य सरकार पाठपुरावा करत होते. काल मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी केंद्र सरकारने जीएसटीचा परतावा देऊन राज्याला अनोखं गिफ्ट दिलं आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याच्या जीएसटीचा परतावा मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच महाविकास आघाडीचे शिल्पकार तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. तसंच शिवसेनेने राज्याच्या वाटयाचा जीएसटी परतावा मिळावा यासाठी संसदेत आवाजही उठवला होता

महत्त्वाच्या बातम्या-

महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रॅपीड कोरोना चाचणी केली अन् रिपोर्ट आला….

महाराष्ट्रातलं सरकार स्वार्थासाठी स्थापन झालंय, कमाई करणं हाच त्यांचा उद्देश, भाजपाध्यक्षांचा घणाघात

“कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या”

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या