बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून आम्ही सर्वांना कोरोना लस देत नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं कारण

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशात 45 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाही कोरोना लस  द्यावी अशी मागणी केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींना पत्र लिहिलं. केजरीवाल यांनी सर्वांना कोरोना लस द्यावी अशी मागणी केली. तर उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

सर्वांचं कोरोना लसीकरण करावं, यासाठी का परवानगी दिली जात नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत यामागचं कारण सांगितलं आहे.

अनेक जण आम्हाला विचारत आहेत ही सर्वांना लसीकरण का केलं जात नाही आहे. याचं कारण म्हणजे या लसीकरण मोहिमेची दोन उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे मृत्यूला रोखणं आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेवा प्रणालीची सुरक्षा. याचा उद्देश असा की ज्यांना कोरोना लस हवी आहे, त्यांंना नाही तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना लस द्यायची आहे, असं राजेश भूषण यांनी सांगितलं आहे.

सोमवारी 24 तासांत कोरोना लशीचे 43 लाख डोस देण्यात आले, हा एक विक्रम असल्याचं राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…अन्यथा उद्रेक होईल’; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

गृहमंत्रिपदी विराजमान होताच दिलीप वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना इशारा

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडूंचा भरणा, मात्र तरीही ‘ही’ एक गोष्ट पडू शकते महागात!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More