बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असं वाटत असतानाच दिल्लीसह काही राज्यात कोरोनाने धुमाकुळ घालायला सुरूवात केली.

देशातील काही भागात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी बघता केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. येत्या काही दिवसात केंद्र सरकार बूस्टर डोसबाबत (Booster Dose) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

केंद्र सरकार बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शक्यता आहे. आता बूस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिने केलं जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर दिल्लीत 29 एप्रिल रोजी याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दिल्लीसह काही राज्यांनी कोरोनाचे काही निर्बंध लादत पुन्हा एकदा मास्कसक्ती केली आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईतही कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही मास्कसक्ती होणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“आज्जींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे, पण आमच्यासाठी नाही”

राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, बाळा नांदगावकर म्हणतात…

बहुप्रतिक्षित KGF 3 कधी येणार?; रॉकी भाई म्हणाला…

“मला टाॅम अँड जेरी आवडतं, पण सध्या माकड उड्या बघतोय”

“तोंडाचं गटार उघडून त्यांनी स्वत:ची लायकी दाखवली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More