बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Russia-Ukraine War | केंद्र सरकारकडून भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

नवी दिल्ली | रशियाचे राष्ट्राध्यक्ष लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद चिघळत असल्याने भारत सरकारकडून युक्रेनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केलं होतं. रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ले करण्यात येत आहेत. त्यातच आता  भारत सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

एअर इंडियाने युक्रेनस्थित भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने पाठवली आहेत. युक्रेनमध्ये 20 हजारांपेक्षा अधिक भारतीय राहत असल्याची माहिती आहे. भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रात माहिती देण्यात आली आहे. आज रात्री एअर इंडियाचं पहिलं विशेष विमान युक्रेमधून उड्डाण करणार असल्याची माहिती आहे.

रशियाकडून युक्रेनच्या 10 शहरांवर हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनमधील 300 पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेल्याची माहिती आहे. रशियाकडून युक्रेनच्या हवाई विमानतळांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. रशियाकडून होत असलेल्या बॉम्ब हल्ल्याने युक्रेनची राजधानी कीव येथे मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, भारताकडून रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असं सांगितलं होतं. मात्र, रशियाकडून होत असलेल्या बॉम्ब हल्ल्याने अनेर युक्रेन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच आता भारत सरकाराकडून 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

पाहा ट्विट- 

थोडक्यात बातम्या-  

रशियाकडून युक्रेनच्या दहा शहरांवर बॉम्ब हल्ला, ‘इतक्या’ नागरिकांचा मृत्यू 

Russia-Ukraine War | “युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी”

Russia-Ukraine War | युक्रेनसोबत रशियाचा नेमका वाद काय?, वाचा सविस्तर

रशियन सैनिकांच्या निशाण्यावर युक्रेनच्या महिला; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

Russia-Ukraine War | ‘इतके’ हजार भारतीय अडकल्यानं चिंतेचं सावट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More