Farmer l केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे नवनवीन निर्णय घेत असते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी कॅबिनेट बैठक पारडं पडली आहे. या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी एक निर्णय म्हणजे केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. तसेच या निर्णयात एकूण तब्बल 14 पिकांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार :
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे विशेष कापसापासून ते मूग डाळ, उडिदाची डाळ, शेंगदाणे, मका यांचा देखील समावेश करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने तांदळाचा देखील MSP दर निश्तित केला. त्यानुसार तांदळाला 2,300 रुपये एमएसपी ठरवण्यात आला आहे, जो मागील एमएसपीपेक्षा 117 रुपये जास्त आहे. त्यामुळे आता कापसाचा नवीन एमएसपी 7,121 असणार आहे. तसेच त्याच्या दुसऱ्या प्रकारासाठी नवीन एमएसपी 7,521 रुपये असेल, जो की पूर्वीपेक्षा 501 रुपये जास्त आहे.
Farmer l कोणत्या पिकाला किती एमएसपी मिळाला? :
तांदळाला 2300 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
तूर डाळीसाठी 7550 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
उडीदाच्या डाळीसाठी 7400 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
मूग डाळीसाठी प्रति क्विंटल 8682 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
शेंगदाण्यासाठी एमएसपी 6783 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
कापसासाठी 7121 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
ज्वारीसाठी 3371 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
बाजरीसाठी 2625 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर दर निश्चित केला आहे.
मकासाठी 2225 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
नाचणीचा एमएसपी 4290 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे.
तीळचा एमएसपी 8717 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर निश्चित केला आहे.
सूर्यफूलासाठी 7230 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दर निश्चित केला आहे.
News Title – Central Government Approves Msp On 14 Kharif Crops
महत्त्वाच्या बातम्या
या राशीच्या व्यक्तींच्या खिशाला कात्री लागणार
कोणी 22 वर्षांचा तरूण तर कोणी घरचा कर्ता, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर 4 समर्थकांनी आयुष्य संपवलं
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा