बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरगुुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांपासुन महागाईनं नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेल सह गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलेंडरसाठी एक हजार रूपये मोजावे लागणार आहेत. मात्र या विषयावर सरकार विचाराधीन असुन, अद्याप निर्णय झालेला नाही. या विषयासंदर्भात एका वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.

केंद्र सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार ग्राहक एलपीजी सिलेंडरसाठी एक हजार रूपये मोजण्यास तयार आहेत, असं दिसून आलं आहे. केंद्र सरकारने अनुदानाच्या मुद्द्यावर अनेक वेळा चर्चा केली. पण, केंद्र सरकार दोन विषयांवर विचाराधीन आहे. एक तर सरकार अनुदान न देता सिलेंडरचा पुरवठा करू शकतं किंवा, देशातील काही मोजक्याच ग्राहकांना अनुदान देऊ शकतं. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्ट संकेत दिले नाहीत.

कोरोना महामारीमुळं जगभरात लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या होत्या त्यामुळं केंद्र सरकारला एलपीजी सिलेंडरची सबसिडी संदर्भात केंद्र सरकारला मदत झाली. याचं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत्या. त्यामुळं सबसिडीमध्ये बदल करण्याची गरज नव्हती. मागील वर्षीच्या मे महिन्यापासुन देशातील दुर्गम भागात आणि एलपीजी सिलेंडर प्लॅन्टपासुन दूर असणारा भाग वगळता अनेक भागात एलपीजी सबसिडी बंद झालेली आहे.

दरम्यान, केंद्र सरकार अनुदानाचा विचार करू शकते, पण ज्या ग्राहकांचे 10 लाख रूपये इतकं उत्पन्न असणारे आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळु शकतं. देशातील अन्य लोकांची योजना बंद पडू शकते. देशात सध्या एलपीजी सिलेंडरचे 29 कोटींपेक्षा जास्त कनेक्शन्स आहेत. त्यातील, 8.8 कोटी कनेक्शन्स उज्ज्वला योजने अंतर्गत आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे नंतर पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टरचा मिळू दे- हेमंत ढोमे

ठेच लागता पायी, वेदना होई तिच्या ह्रदयी! लेकराला मृत्यूच्या दारातून आणलं परत, पाहा व्हिडीओ

”अनंत गीतेंची जी अवस्था आहे तिच शिवसैनिकांची आहे, त्यांना कोणी विचारत नाही”

मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं- किशोरी पेडणेकर

”आमचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास, ते आमचा मान ठेवतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More