बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | केंद्र सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) पुढील महिन्यात आनंदाची बातमी देणार असल्याचं कळतंय. सरकारी कर्मचाऱ्यांना या वर्षात दुसऱ्यांदा महागाई भत्यात (Dearness Allowance) वाढ मिळणार आहे. वाढती महागाई लक्षात घेता सरकार 5 ते 6 टक्क्यांनी महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवणार आहे, अशी माहिती समोर येत आहेत. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी (Arrears) मिळणार आहे.

कोव्हिड – 19 (Covid – 19) च्या महामारी दरम्यान शासनाने कर्मचाऱ्यांचे 18 महिन्याचे महागाई भत्ते (DA) रोखून ठेवले हाेते. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्याच्या मागणीचा सरकारकडे तगादा लावला होता. कर्मचारी जानेवारी 2020 ते जून 2021 दरम्यानच्या महागाई भत्त्यांची मागणी केली होती. परंतु आतापर्यंत सरकारकडून तशाप्रकारची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शासनाने 2021 सालापासून आतापर्यंत महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ केली आहे. तर यावर्षीच्या मार्चमध्ये 3 टक्क्यांची वाढ महागाई भत्त्यात झाली होती. आताच्या तारखेला कर्मचाऱ्यांना बेसीक सॅलरीवर (Basic Salary) 34 टक्के महागाई भत्ता मिळतो आहे. सरकारने जर हा निर्णय घेतला तर येत्या काळात 50 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार जर शासनाने या महिन्यात महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला तर शासन अगोदरची थकबाकी आणि आता वाढणार असणारे टक्के अशी एकत्र रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर येणार आहे,

थोडक्यात बातम्या – 

’50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं’; रामदास कदम ढसाढसा रडले

“सत्तेची भांग प्यायलेले उद्या मातोश्री आणि सेना भवनावर सुद्धा कब्जा करतील”

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका

एकीकडे पूरग्रस्तांचे हाल तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरूये- आदित्य ठाकरे

राष्ट्रपती निवडणुकीत ‘त्या’ आमदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More