वाढत्या कोरोनामुळे केंद्र सरकाने घेतला मोठा निर्णय!

नवी दिल्ली | चीनमधली कोरोनाची (Corona) परिस्थिती पुन्हा काळजाचा ठोका चुकवू लागलीये. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जग ज्या चीनमधून निघालेल्या विषाणूनं बंद पाडलं होतं. त्याच कोरोनानं आज चीनला बंद पाडलंय. चीनसह अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या घटना पाहता केंद्र सरकार सतर्क झालं आहे.

कोविडच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाने बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे यादृच्छिक नमुने घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. विमानतळावर परदेशी प्रवाशांची कोविड चाचणी केली जाईल

पॉझिटिव्ह आढळल्यास कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. लोकांनी प्रतिबंधासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, परंतु प्रतिबंधात्मक उपायांवर जोरदार काम सुरू झालं आहे.

ज्या लोकांना आधीच कोणताही आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचं पालन करावं. आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला कोविड संदर्भात आढावा बैठक घेणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-