Top News महाराष्ट्र मुंबई

कोरोनाची लस घ्यायची असेल तर ही गोष्ट आत्ताच करा, नाहीतर येऊ शकते मोठी अडचण!

मुंबई | कोरोनाची लस उपलब्ध झाल्याने कोरानाविरूद्धच्या लढाईत आपण विजय मिळवण्यासाठी सज्ज झालो आहोत. कोरोना लसीच्या लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरूवात झाली आहेत. मात्र कोरोनाची लस घ्यायची असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागणार आहे.

कोरोना लस घ्यायची असेल तर लसीकरणासाठी नागरिकांनी लवकरात लवकर त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी ‘आधार’चा पुरावा असणे खूप गरजेचं आहे.

कोरोनाच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना ही लस मिळणार आहे. लसीकरणासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डला लिंक असेल तर तुम्हाला पहिला डोस आणि दुसरा डोस याबाबतची माहिती मिळणार आहे.

लस कशी, कधी आणि कोणती देण्यात आली ही माहिती डिजिटल रेकॉर्ड करण्यासाठी आधार गरजेचं असल्याचं कोविड 19 डेटा मॅनेजमेंट आणि एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजीचे चेअरमन आरएस शर्मा यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही- शरद पवार

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभा

खळबळजनक! चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली

क्रिकेटमध्ये सेक्स स्कँडल?; 20 वर्षीय क्रिकेटपटूला रंगेहाथ पकडल्यानं खळबळ

“झाडाचं पान का पडलं म्हणूनही भाजप आंदोलन करू शकतं त्यामुळे आम्ही फारसं लक्ष देत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या