बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरी गमावलेल्यांना सरकार देणार भत्ता ‘ही’ आहे भन्नाट योजना

नवी दिल्ली | कोरोनाकाळात अनेक लोकांना नोकरीला मुकावं लागलं आहे. नोकरी गेल्यामुळे असंख्य कुटुंबांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. कामावरुन कमी करणाऱ्या कंपन्यांकडून फारसे आर्थिक साहाय्य न मिळाल्याने अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे. नोकरी गमावलेल्या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारने अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेचा कालावधी 30 जून 2022 पर्यंत वाढवला आहे. कर्मचारी राज्य विमा मंडळ म्हणजेच ईएसआयसीवर या योजनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोरोनाकाळात एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली असेल तर त्याला बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद या योजनेत केलेली आहे. या योजनेचा लाभ 50 हजारांहून अधिक लोकांनी घेतला आहे.

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भत्त्याचा लाभ कोणताही कर्मचारी तीन महिन्यांपर्यंत घेऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकदाच दावा करणे शक्य आहे. या तीन महिन्यांत त्या व्यक्तीनं नवीन व्यवसाय किंवा नोकरी सुरू करणे अपेक्षित आहे. तीन महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या 50 टक्के हिस्सा या भत्त्याच्या रूपातून दिला जाणार आहे. एकदा या दाव्याचा लाभ घेतल्यानंतर त्या व्यक्तीची नोकरी काही कारणास्तव पुन्हा गेल्यास संबंधीत व्यक्तीला पुन्हा या योजनेसाठी दावा करण्यात येणार नाही.

दाव्याचा फॉर्म हा ईएसआयसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा अर्ज भरून तो जवळच्या ईएसआयसीच्या शाखेत जमा करावा लागेल. याचबरोबर 20 रुपयांचा स्टॅम्पपेपर देऊन शपथपत्र द्यावे लागेल. यावर कंपनीचे नाव आणि काढून टाकण्याचे कारण सांगावे लागेल. एखाद्या कर्मचार्‍याला गैरवर्तनावरून काढले असेल तर त्याला लाभ मिळणार नाही.

योजनेस पात्र ठरण्यासाठीचे निकष जाणून घ्या-

  • योजनेसाठी दावा करणारा व्यक्ती खाजगी कंपनीत किंवा संस्थेत काम करत असताना कोरोनाकाळात नोकरी गमावलेला असावा.
  • बेरोजगार हा 21 हजारांपेक्षा कमी वेतन असणारा असावा.
  • त्याच्या वेतनातून ईएसआयसीचा हप्ता कपात होत असावा.

थोडक्यात बातम्या- 

अखेर बहूचर्चित आणि वादग्रस्त कृषी कायदे लोकसभेत रद्द

‘राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे’

1 तारखेला शाळा सुरु होणार?, ओमिक्राॅन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी ‘ही’ दिली माहिती

ठाकरे सरकारचे तीन नवे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर; लवकरच करणार खुलासा

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल एवढ्या गावात झालं 100% लसीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More