बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्र सरकार जून-जुलै महिन्यांपासून देशातील लसीकरणाचा वेग वाढवणार”

नवी दिल्ली |  मागील वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू आता कोरोनाची परिस्थिती हळू-हळू सुधारत आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा सामना करायचा असेल, तर त्यावर लसीकरण हा एक उत्तम उपाय असल्याचं बोललं जात आहे.

अशातच आजपासून देशातील 18 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे केंद्र सरकारमार्फत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ही माहिती भाजप पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. आज अमित शहा यांनी अहमदाबाद या ठिकाणी जाऊन लसीकरण केंद्राची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ही मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सरू करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकार जून-जुलै महिन्यांपासून केंद्र सरकार देशातील लसीकरणाच्या मोहिमेचा वेग वाढवणार असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं आहे.

सध्या भारत हा लसीकरणात आघाडीवर आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन, आम्ही आमचं ध्येय लवकरात लवकर गाठणार असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेस अन् राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

“अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण आता…”

बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं- राज ठाकरे

दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा भेट; नव्या चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More