विधानसभेपूर्वीच मोदींचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; ‘या’ 3 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी

Central Govt | केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शुक्रवारी (16 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या निर्णयामुळे पुणे आणि ठाणेकरांना मोठा लाभ होणार आहे. (Central Govt )

केंद्राने महाराष्ट्रासाठी 3 मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वाढवण बंदराचाही समावेश असून यासाठी 76 हजार 200 कोटीचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर पुण्यातील मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या विस्तारालाही मंजुरी दिली आहे. स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमी लांबीच्या विस्तारास ही मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल 2,954.53 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.हा प्रकल्प 2029 सालापर्यंत पूर्ण होणार आहे. याचसोबत ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला देखील मंजूरी मिळाली आहे. हा प्रकल्प 12,200 कोटीचा असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडण्यात येणार आहे.

ठाणे इंटग्रिल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प-

प्रकल्पाचा खर्च- 12,200 कोटी रुपये
मार्ग लांबी- 29 किमी, त्यापैकी 26 किमी उन्नत आणि तीन किमी भूमिगत
स्थानके- 22, त्यापैकी 20 उन्नत आणि 02 भुयारी
लाभ काय होणार?- या प्रकल्पामुळे मूळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल.तसेच शहरातील विविध भागांशी थेट रिंग मेट्रो मार्गाने प्रवास शक्य होईल.(Central Govt )

केंद्राचे महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय-

वाढवण बंदर : या प्रकल्पासाठी तब्बल 76 हजार 200 कोटीचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात आला आहे.(Central Govt )

पुणे मेट्रो फेज-1 : या प्रकल्पाच्या दक्षिणेकडे स्वारगेट ते कात्रज पर्यंत 5.46 किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 2,954.53 कोटी रुपये यासाठी खर्च केले जातील. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.

News Title-  Central Govt approved 3 projects for Maharashtra

महत्वाच्या बातम्या-

वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video

देशात रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच, साबरमती एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले अन्…

तब्बल 1 महिन्यांनी इंधनदरात घसरण?; जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

कुंभ, मकर, मीनसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा, भाग्य उजळणार!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?; मुख्य निवडणूक आयुक्तांनी अखेर सांगितलं