Top News आरोग्य कोरोना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

दिल्ली | देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसतेय. अनेक मोठे नेते मंडळी तसंच अभिनेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. नुकतंच केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा कोरोनाचा अहवालंही पॉसिटीव्ह आलाय. तर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका मुख्य सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळालीये.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनाही कोरोनाची लागण झालीये. लव अग्रवाल यांनी स्वतः ट्विट करून कोरोनाबाधित असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाची लागण झाल्याचं समजताच त्यांनी स्वतः घरीच आयसोलेट करून ठेवलं आहे.

अग्रवाल त्याच्या ट्विटमध्ये लिहितात की, “मी कोरोनाची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. आपल्या प्रोटोकॉलनुसार मी घरीच स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. दरम्यान माझ्यासोबत काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचसोबत नजीकच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येईल.”

दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा कोरोनाने बळी गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 1192 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर चार हजांराहून अधिक जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकारला झटका; ग्रामपंचायत प्रशासकाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यात घडलेल्या ‘या’ प्रकारानं पोलिसांची प्रतिमा मलीन; एका पोलिसाचं निलंबन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या