देश

‘या’ तारखेपासून शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता शाळा पुन्हा सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. यासाठी केंद्र सरकारने योजनाही आखली आहे. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र सरकारकडून लॉकडाउनची घोषणा कऱण्यात आली होती आणि शाळा बंद केल्या होत्या. 23 मार्चपासून संपूर्ण देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. 31 ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या अनलॉकच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसं आणि कधी आणायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांकडे असणार आहे.

शाळा सुरु करण्याच्या सरकारच्या योजनेप्रमाणे पहिल्या 15 दिवसांमध्ये 10 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितलं जाऊ शकतं. यानंतर वेळमर्यादेत सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक इयत्तेतील तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. त्याचप्रमाणे शाळा आणि वर्ग सॅनिटाइज करणं अनिवार्य असणार आहे.

शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितलं जाऊ शकतं. यामध्ये सकाळी 8 ते 11 आणि 12 ते 3 अशा दोन शिफ्ट असण्याची शक्यता आहे. यामध्ये सॅनिटाइज करण्यासाठी एक तास दिला गेला आहे. अद्यापही प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याबद्दल कोणतीही योजना नाही.

महत्वाच्या बातम्या-

कली पुरी यांना २०२० वर्षातील ‘सर्वात प्रभावशाली महिला’ पुरस्कार देऊन सन्मानित

एकनाथ खडसेंनाही वाढीव विजबिलाचा ‘शॉक’, एका महिन्याचं बिल तब्बल…..

आनंदाची बातमी! “कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांना शंभर टक्के यश”

संशोधकांना मोठं यश; कोरोना संसर्गाचे ‘हे’ सहा प्रकार आणले समोर

कोरोनाच्या औषधाचा दावा अंगलट; न्यायालयाने ‘पतंजली’ला ठोठावला इतक्या लाखांचा दंड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या