बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…त्यामुळे तपास यंत्रणांवर कोणाचाही विश्वास बसणार नाही – एकनाथ शिंदे

ठाणे | राज्यात मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. केंद्र सरकारवर ईडी ,एनआयए आणि एनसीबी या तपास यंत्रणांचा वापर राजकारणासाठी केला जातो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय तपास यंत्रणावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यावर देखील आयकर विभागाने कारवाई केली आहे. त्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी झाला पाहिजे, असं म्हटलं आहे.

तसेच तपास यंत्रणांचा दुरूपयोग होऊ नये. त्यामुळे तपास यंत्रणांवर कुणाचाही विश्वास बसणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांकडून महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं आहे. इथे जमलेली गर्दी म्हणजे काही सत्यनारायाणाची पुजा नाही किंवा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम नाही. इथे कोणताही गोष्ट वाटण्यासाठी बोलावलं नाही. जे आले आहेत ते देण्यासाठी आले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्राला आणखी एका चक्रीवादळाचा धोका! ‘या’ जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता

“राज्यातून कर गोळा करता मग त्यांचा वाटा का देत नाही?”

मुंबईत डीसीपी सुजाता पाटील यांना अटक; एसीबीने सापळा रचून पकडलं

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार ‘पत्रकार मारिया रेसा’ आणि ‘दिमित्री मुरातोव्ह’ यांना जाहीर!

“यांची काय औकात, तिकडं त्यांना कोण विचारतंय, उद्या सगळ्यांचा भांडाफोड करणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More