Top News पुणे महाराष्ट्र मुंबई

‘…की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा’; केंद्रीय मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट

पुणे | भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार भल्यापहाटे स्थापन झालं खरं मात्र ते फक्त 72 तास टिकलं. त्यानंतर महाविकास आघाडीने एकत्र येत सरकार स्थापन करत भाजपच्या तोंडसा घास हिसकावून घेतला होता. मात्र अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही आपलं मत व्यक्त केलं.

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली. मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, असंही आठवले म्हणाले.

दरम्यान, रामदाल आठवलेंनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बोरूबहाद्दर राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”

मुंबईत नवीन वर्षाची गच्चीवरही ‘नो पार्टी’; देखरेखीसाठी 35 हजार पोलीस तैनात

पार्थ पवारांना उमेदवारी मिळणार का?; रोहित पवार म्हणतात…

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या की हत्या; सीबीआयने स्पष्ट करावं- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या