वारकऱ्यांसाठी पंढरपूरात दानवे बनले चहावाला, दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा
पंढरपूर | आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणांवरुन निघालेल्या पालख्या आज पंढरपूरात विसावल्या. चंद्रभागेत स्नान करुन सर्वांना विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस लागली आहे. आज पहाटेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासोबत शासकीय महापूजा केली. पंढरपूरात 12 लाखांहून अधिक भाविक आले आहेत. त्यात आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील पंढरपूरात दाखल झाले आहेत.
कोरोनाच्या महाप्रचंड विघ्नानंतर आता 2 वर्षांनी वारी भरली आहे. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर दमलेल्या वारकऱ्यांसाठी छोटी मोठी हॉटेल्स लागलेली असतात. पंढरपूर तालुक्यातील सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूरात लागले आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चहा बनवून वारकऱ्यांना पाजायचे पुण्य केले आहे.
यावेळी त्यांनी पायी चालत आलेल्या, दमलेल्या वारकऱ्यांची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. रावसाहेब दानवेंच्या या कृतीचंं सध्या कौतुक होत आहे. तर आज मुख्यमंत्री शिंदेंनी देखील महाराष्ट्राच्या भरभराटीचे साकडे विठ्ठलाकडे घातले आहे. यावर्षी बीड जिल्ह्यातील मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले यांना महापूजेचा मान मिळाला आहे.
हा पाऊस असाच सुरु राहून सगळीकडे पीक पाणी येऊदेत, तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊन बहरुदे, अशी मागणी त्यांनी विठ्ठलाकडे केली. यानंतर ते मंदिर समितीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारुप आराखडा तयार करुन सादर करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
थोडक्यात बातम्या –
‘एखाद्या हिरोईन सोबत लग्न लावून दे ना’, चाहत्याच्या अजब मागणीला सोनू सूदचं भन्नाट उत्तर
शिवसेनेत मोठे बदल, उद्धव ठाकरेंनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Koffee With Karan 7: दीपिकाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे आलिया ट्रोल
मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?, मुख्यमंत्री शिंदेंकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर
Comments are closed.