बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ‘या’ चार मंत्र्यांचा राजीनामा

नवी दिल्ली | देशात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारा दरम्यान केंद्रीय मंत्री मंडळातील सध्या कार्यरत असलेल्या अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच केंद्रातील चार मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातील चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामध्ये सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार आणि निशंक यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील यांच्यासह इतरही नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, रावसाहेब दानवे यांना या मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री कार्यरत आहेत.

ध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कार्यरत असलेल्या 53 मंत्र्यांची संख्या 81 मंत्र्यांवर जाणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या शपथविधीमध्ये नेमकं कोणाला मंत्रीपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यामुळे राजकीय वातावरणात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

 

थोडक्यात बातम्या

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More