बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाचा चपराक; आता नियम मोडले तर..

मुंबई | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाने चपराक दिली आहे. राज्यात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्याची (Central Motor Vehicle Act) अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

या कायद्यानुसार आता वाहन चालकांसाठी नवीन दंड नियमावली लागू करण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीत दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहतुकीच्या अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना 1 हजार रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर चार चाकी वाहन चालकांना 2 हजार रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडले तर दुचाकीस्वारांना 1 हजार, चार चाकी चालकांना 3 हजार व इतर चालकांना 4 हजार रूपये दंड भरावा लागेल.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी इतर दंडाच्या रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात वाहतूकीचे नियम ढाब्यावर बसवले जातात, त्यात अपघातांचं वाढतं प्रमाण पाहाता परिवहन विभागाने नवीन कायद्यांची अंमलबजावणी केली आहे. 13 डिसेंबर 2021पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधींची मुंबई सभा होणार?; उच्च न्यायालयात याचिका दाखल

“त्यांच्या बापाशी लढून मी पक्षाबाहेर पडलोय, नाना पटोले कुणाच्या…”

कपिल देवची इंग्रजी ऐकली का? 83चा व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

Second Dose घेतलाय का? नसेल तर भरावा लागणार 500 रूपये दंड

मराठवाड्याचं टेंशन वाढलं! ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More