बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई-पुण्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात धावणाऱ्या ‘या’ रेल्वेगाड्या 10 मे पर्यंत रद्द

मुंबई | वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात आंतरजिल्हा तसेच जिल्हा अंतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील मध्य रेल्वेने प्रवासी संख्या घटल्याने 10 मे पर्यंत दहा प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून प्रवासावरही निर्बंध लादण्यात आले आहेत त्यामुळे याचा थेट परिणाम रेल्वेवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तोट्यात चालत असलेल्या रेल्वेगाड्या तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तोट्यात असलेल्या गाड्यांमध्ये मुंबई-मनमाड जाणारी पंचवटी एक्सप्रेस, नागपूर-पुणे, दादर-शिर्डी साईनगर एक्सप्रेस तसेच मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेससह इतर गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे या गाड्या 10 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. रद्द करण्यात आलेल्या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1. 02113/02114- पुणे नागपूर स्पेशल (अप/डाऊन) 27 एप्रिल ते 10 मे पर्यंत रद्द

2. 02109/02110- मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (अप/डाऊन) 27 एप्रिल ते 10 मेपर्यंत रद्द

3. 02272/02271- जालना-मुंबई (अप/डाऊन) 27 एप्रिल ते 10 मे पर्यंत रद्द

4. 02189/02190- मुंबई-नागपूर (अप/डाऊन) 28 एप्रिल ते 10 मे पर्यंत रद्द

5.02111/02112- मुंबई-अमरावती (अप/डाऊन) 28 एप्रिल ते 11 मे पर्यंत रद्द

 

थोडक्यात बातम्या

“देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

दिलासादायक! पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत मोठी घट

“संकट आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं हीच महाराष्ट्राची ओळख झाली”

परमबीर सिंहांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा पत्राद्वारे गौप्यस्फोट

पुणेकरांच्या मदतीसाठी धावला हरभजन सिंग, केली ‘ही’ लाखमोलाची मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More