बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष, देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीशी संपर्क

मुंबई |  राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील नागरिक संकटात आहेत. या परिस्थितीवर राज्य सरकार कामाला लागलं आहे. या परिस्थितीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत संपर्क केला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

पाऊस आणि पुरात तसेच भूस्खलनाच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत प्रशासनाने अधिक गांभीर्याने स्थितीकडे लक्ष द्यावं. तळिये गावांत मृतदेह बाहेर काढण्याचे काम गावकर्‍यांना करावे लागले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमित शहा यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठवल्या आहेत. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना 2 लाख रूपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केली आहे. चिपळूण येथे लष्कराची तुकडी दाखल होऊन मदतकार्य करीत आहे. एनडीआरएफच्या 26 चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-17, दोन सी-130 तसेच एक एमआय-17 हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या वतीने तळिये या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले जात आहे, अशी माहिती नित्यानंद राय यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

 

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मदतीची मागणी

“अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा”

सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ, लवकरच 50 हजारापार जाण्याची शक्यता

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

नागरिकांनो सावधान! देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढतोय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More