बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आणखी एक परीक्षा पुढे ढकलली, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई | राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने होणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

‘राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच CET- सेलद्वारे प्रत्येक वर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव पहायला मिळतोय. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत यांच्या सांगण्यानुसार, पालक तसेच अनेक विद्यार्थ्यांद्वारे या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकल्याव्यात यासंदर्भात सतत मागणी केली जात होती. सध्या राज्यभरात कोरोनाने थैमान घालतंय, हा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय.

परिक्षा रद्द केल्याने या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. तर नुकतंच दोन दिवसांपूर्वीच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

कृषी मंत्र्यांचं स्टिंग ऑपरेशन, कामचुकार अधिकाऱ्यावर केली कारवाई

जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत- रामदास आठवले

भिवंडीनंतर ‘या’ शहरात 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीएमसीचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन; ‘या’ सहा विभागांमध्ये राबवलं जाणार ‘मिशन झिरो’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More