बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

69 वर्षांच्या आजीबाईंची कमाल, ‘काँटे की टक्कर’ देत पटकावलं सरपंचपद!

पुणे | राजकीय नेते ज्या वयात निवृत्ती घेतात त्या वयात सरपंचपदाची निवडणूक लढवणं आणि निवडून येणं तशी अशक्यच गोष्ट, मात्र 69 वर्षांच्या आजीबाईंनी ही गोष्ट खरी करुन दाखवलीय. 

खेड तालुक्यातील चास गावच्या गावकऱ्यांनी चक्क सखुबाई मुळूक या आजीबाईंना सरपंचपदाची संधी दिलीय. विरोधी उमेदवाराचा त्यांनी 56 मतांनी पराभव केला. 

विशेष बाब म्हणजे निवडून आल्यानंतर आजीबाईंची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आलीय. नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्य या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More