“मोदींचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धव ठाकरे उडून जातील”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | उद्धव ठाकरे हे मोदीजींचा ऐकेरी उल्लेख करतात. मोदीजी यांना देशानं पसंती दिलीय. मोदीजी यांचं वादळ महाराष्ट्रात आल्यावरे उद्धव ठाकरे उडून जातील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतंय, भारतीय लोकांवर त्यांचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कसं सोडलं? याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिलंय. त्यांना रोज लोकं सोडून जात आहेत, असं बावनकुळे म्हणालेत.

उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहीत आहे शिवसेना कुणाची? हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

मोदीजी यांची उद्धव ठाकरे यांना भीती वाटतेय. 2014 आणि 2019मध्ये ज्यांच्या भरवश्यावर तुमचे खासदार निवडून आले. त्या मोदींवर टीका करणे ही बेईमानी आहे. आता मोदीजींच्या नावाने कितीही मशाली लावल्या तरी 2024मध्ये त्या विझणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलताना तारतम्य सांभाळावे. मोदीजींना वारंवार ऐकेरी उल्लेख केल्यास स्फोट होऊ शकतो, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-