नागपूर | मानवता जपणाऱ्या संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय. अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनू हा एक पाऊल पुढं होता, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी पुण्यात केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा भुजबळांनी समाचार घेतला.
सर्व संतांनी मानवतेत एकता आणली, कधीही भेद केला नाही मात्र मनुस्मृतीने काहींनाच श्रेष्ठ ठरवलं होतं. त्यामुळेच महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचं आवाहन केलं होतं, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण
-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!
-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!
-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत- अमित शहा
-विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???