“राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे”

उल्हासनगर |  सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी चालू केल्यानं 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबऴ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

सत्ताधारी भाजपला राम मंदिराशी काहीही देणघेण नाही. त्यांना फक्त सत्तेत यायचे आहे, असंही यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले.

भविष्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप त्यांनी  मोदी सरकारवर केला आहे.

दरम्यान, उल्हासनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यात भुजबळ बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

-राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

-“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”

-“राज्याच्या मंत्रीमंडळात एक तरी शेतकऱ्याचं पोरगं दिसतंय का”??

-“बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो फक्त तुमच्यात”

-भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला की मोदी घरात बसणं पसंत करतात- राहुल गांधी