बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पराभवाची सवय करून घेतली पाहिजे, कारण आता वारंवार फटके बसणारेत”

नाशिक | पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना इशारा दिला. छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

छगन भुजबळांनी चंद्रकांत पाटील यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी केला.

आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला आहे.

समीर भुजबळ जेलमध्ये असताना चंद्रकांतदादांकडे मदत मागायला कसा जाईल? सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहीत होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे ईडी किंवा सीबीआय नाही. तसेच अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं स्वाभाविक आहे, अशी टीकाही  छगन भुजबळांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

अदर पुनावालांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा का पुरवली- नाना पटोले

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

…अन् भर सामन्यात डेव्हिड वॅार्नर ढसाढसा रडला, फॅन्सही हळहळले!

सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिलेल्या ‘त्या’ पोलीस महासंचालकाने दर्शवली असमर्थता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More