“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”
नाशिक | अखेर दहावीचा निकाल शुक्रवारी म्हणजे आज 17 जून रोजी (Maharashtra SSC 10th Result 2022) दुपारी एकच्या दरम्यान जाहीर झाला. दिलासादायक बाब म्हणजे यावर्षी राज्यात दहावीचा निकाल हा 96.94% लागला. मात्र 3.06 टक्के विध्यार्थी नापास झाले.
यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना नापास झालेल्या विध्यार्थ्यांना साल्ला दिला. नापास झालात म्हणून निराश होऊ नका. मी दोन वर्षे जेलमध्ये राहिलो होतो तरी सुद्धा मी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. कोरोनाकाळात तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण मिळाला तरी सुद्धा तुम्हाला डिप्रेशन येतं का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विध्यार्थ्यांना केला? डिप्रेशन न घेता चांगला अभ्यास करा, असा सल्ला त्यांनी विध्यार्थाना दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाचे उपकेंद्र याचं काम अनेक दिवसांपासून रखडले गेले होते मात्र ते आता लवकरच नाशिक मध्ये उभं राहणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन आज शिवनाई गावात पार पडले. यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यामंत्री डॉ. भारती पवार हे या भूमिपूजनासाठी उपस्थितीत होते.
आज जाहीर झालेल्या निकालावर छगन भुजबळ यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जेव्हा मी दोन वर्षे जेलमध्ये होतो कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेतलं नव्हतं अथवा मी बिलकूल सुद्धा डिप्रेशनमध्ये गेलो नाही, असं भुजबळ यांनी भाषण करत असताना विध्यार्थ्यांना सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं”
‘…तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये’; कृषीमंत्री दादा भुसे यांचं आवाहन
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ, वाचा आकडेवारी
काय सांगता! आता व्हॉट्सअॅपवरून कर्जही काढता येणार, वाचा सविस्तर
“पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”
Comments are closed.