Top News आरोग्य कोरोना राजकारण

कार्यालयातील 6 जणांना कोरोनाची लागण, छगन भुजबळ होम क्वारंटाईन

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. ही संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाची लागण झाल्याचंं समोर आलं आहे. त्यानंतर आता अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून या सर्वांची चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आहे. यानंतर छगन भुजबळ यांनीही स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे.

कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्यात येणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान छगन भुजबळ यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं असून गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची तपासणी करण्याचं आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो….’; नाथाभाऊंनी केला मोठा गौप्यस्फोट

“…म्हणून कंगणा राणावतला Y+ सुरक्षा दिली”

चिंताजनक! पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा वाढला कोरोनाचा आकडा

‘मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीतील फ्लॅट बळकावला’; भाजपचा गंभीर आरोप

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या