Top News आरोग्य कोरोना नाशिक महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

photo Credit- Facebook | Ncp

नाशिक | महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात याआधीही मंत्र्यांंना कोरोनाची लागण झाली असल्याने गेल्या काही दिवसात मंत्रीमंडळात कोरोनासत्र मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नाशिकमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता भुजबळांनी नुकतीच आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान नाशिक शहरात रात्रीची संचारबंदी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.

छगन भुजबळांनी साहित्य संमेलनाच्या आढावा बैठकी आणि इतर राजकीय बैठकींना उपस्थिती लावली होती त्यामुळे अनेक लोकांच्या संपर्कात ते आले होेते.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”

“…अन्यथा तुम्हाला कोरोना झाल्यास सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही”

‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं

रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14 ची विजेती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या