Top News

छगन भुजबळ खरंच शिवसेनेत प्रवेश करणार? उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई |  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यावर विचारले असता वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल, असं म्हणत भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाचा सस्पेन्स कायम ठेवला.

उद्धव ठाकरेंच्या सूचक वक्तव्यानंतर छगन भुजबळ लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढू लागला आहे.

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जरी मोठ्या खुबीने होत असल्या तरी त्यांनी मात्र या चर्चांचं खंडन केलं आहे.

दुसरीकडे मात्र भुजबळांना शिवसेनेत घ्यायला शिवसेनेच्या एका गटाचा विरोध असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-मी कोणाचीही सुपारी घेतली नाही- शिवेंद्रराजे भोसले

-उद्धव ठाकरेंच्या तोंडी राज यांच्याबद्दल आपुलकीचे शब्द; म्हणाले…

-राष्ट्रवादीतील आणखी एक नेता भाजपच्या गळाला???

“उदयनराजे माझे मोठे भाऊ आहेत, मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला मदत करतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या