बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या”

नाशिक | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असं दिसत आहे. पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं तोंडभरून कौतुक केलं. ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

बंगालच्या निकालानंतर देशात भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. मै अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या. त्याच प्रमाणे ममता दीदीही मै अपना बंगाल नही दुंगी म्हणत लढल्या. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती, असं भुजबळ म्हणाले.

बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे 8 ते 10 मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही, असा टोला भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.

आसाम वगळता भाजपला कुठेच यश मिळालं नाही. भाजप विरोधात देशात प्रचंड लाट तयार झाली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. पंढरपूरचा निकाल गटतट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे. त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असंही भुजबळ म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“दीदी ओ दीदी या अपमानजनक टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर”

कडक सॅल्यूट! डाॅक्टर आणि नर्सवर हात उचलण्याआधी हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

‘अंदाज अपना अपना’, बंगालमध्ये प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं तसंच झालं

“कोणीही जिंको, देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही”

भारतनानांना जे जमलं ते मुलाला राखता आलं नाही, पंढरपुरात भगीरथ भालकेंना धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More