राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, ‘हे’ दोन बडे नेते आमने-सामने

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) बंड व शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. शिवसेनेतील बंडानंतर आता राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीतील दोन बडे नेते आता आमने-सामने आले आहेत.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा सरस्वतीदेवीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे.

सरस्वतीदेवीने किती शाळा काढल्या, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला आणि राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं. भुजबळांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तर नाराजी दर्शवलीच पण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीदेखील जाहीर नाराजी दर्शवत काळजीपूर्वक बोला असा सल्लाही दिला.

विरोधकांसोबतच आपल्याच पक्षातील नेत्यांनी भुजबळांना खडेबोल सुनावल्यानंतर आता भुजबळांच्या समर्थकांनी देखील नाराजी दर्शवली आहे. आम्ही पक्षाचे नाही तर भुजबळ साहेबांचे समर्थक आहोत, असंच भुजबळांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सपना माळी शिवणकर यांनी रोहित पवारांच्या वक्तव्यावरून तीव्र नाराजी दर्शवली आहे.

काल आलेल्या पोरांनी तुम्ही काळजीपूर्वक बोला हे सांगणं चुकीचं आहे. आम्ही रोहित पवारांना समज आणि विनंती करत असल्याचंही सपना माळी शिवणकर म्हणाल्या. तर छगन भुजबळ काही चुकीचं बोलत असतील तर ते सिद्ध करून दाखवा, असं आव्हान देखील त्यांनी दिलंय.

दरम्यान, भुजबळांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्टेजवरून नाही तर समता परिषदेतून आपले विचार व्यक्त केलेत, असंही सपना माळी शिवणकर म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील हे नाराजीनाट्य चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More